प्रतीक्षा संपली! रशियाने बनवली जगातील पहिली ‘कोरोना लस’
रशियाने मारली पहिली बाजी!
11 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीचे जीवन विस्कळीत आणि उद्धवस्त करून टाकले आहे.जभरातील देशांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे कोरोना विषाणूने मोडले आहे. सर्व सामन्यांच्या बेहाल झाले असून एक वेळेसच्या भाकरीसाठी देखील सामान्य माणूस मौताज झाला आहे. अशा भयाण अवस्थेमध्ये आयुष्य पुढे चालवण्याकरिता जगभरातील नागरिक सध्या केवळ आणि केवळ कोरोनावर मात करेल अशा प्रभावी लशींच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लास तयार करण्याचे काम जगभरात युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देश कोरोवर लास बनवत आहेत.मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. कारण संपूर्ण जग ज्या दिवसाकडे डोळे लावून बसलं होतं, तो दिवस अखेर आलाच. रशियाने कोरोना लस तयार केली आणि त्याला आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली. इतकंच नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचं सांगितलं.
रशियाचा हा दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीच या लशीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.