बीड

बुलडाण्यातील धक्कादायक घटना, भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू

बुलडाणा, 11 ऑगस्ट : पावसानं जरा उसंत घेतल्यानंतर एक धक्कादायक घटनेनं सैलानी गाव हादरलं. घराची भिंत कोसळून पडली. या दुर्घटनेमध्ये माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. या माय-लेकी मध्य प्रदेशातील खंडवा परिसरातील मूळच्या रहिवासी होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी परिसरात त्यांनी बांधेलं घर एका क्षणात कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं.

घराची भिंत अंगावर पडल्याने माय-लेकीचा मृत्यू झाला. यामुळे गावात मोठी खळबळ पसरली आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथून सुगवंती काजळे ह्या आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या18 वर्षीय मुलीला सैलानी येथे घेऊन आल्या. माय-लेकी मिळून ज्या ठिकाणी राहात होत्या त्या घराची भिंत कोसळली. चिखली तालुक्यातील सैलानी इथे टिनपत्र्याच्या खोलीत आई-मुलगी दोघंही भाड्यानं राहात होती. या परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं भिंत कोसळली आणि अनर्थ घडला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली दबून आई-मुलीचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रायपूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्या हा ढिगारा हटवण्यात आला असून आई-मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.