बीड

उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्‍टरने केले ‘हे’ संतापजनक कृत्य

10 Aug :- सध्य परिस्थितीमध्ये डॉक्टर हा एका ईश्वरापेक्षा कमी नाही. कारण स्वतःच्या जीवाची,स्वतःच्या कुटुंबाच्या प्राणांची तमा न बाळगता डॉक्टर आहोरात्र कोरोनाच्या विळख्यातून रुग्णांची प्राण वाचवत आहेत. मात्र समजतील काही डॉक्टरांच्या संतापजनक कृत्यांमुळे समाजातील नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे. शिक्रापूर – न्हावरा ता. शिरूर येथे एका दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेकडे डॉक्‍टरने शरीरसुखाची मागणी करत तिचा डॉक्‍टरने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी डॉक्‍टरवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिक्रापूर येथील पीडित महिला आजारी असल्याने तिने काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. परंतु प्रकृतीमध्ये काही फरक पडत नसल्याने पीडितेच्या वडिलांनी या महिलेला न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

या हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार सुरू असताना रविवारी दि. 9 रात्री डॉ. लाड यांनी पीडितेला तपासणी करण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी महिला डॉक्‍टरांना ढकलून देत घाबरून डॉक्‍टरांच्या केबिन बाहेर आली.आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली सर्व माहिती सांगितली.

त्यानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील डॉ. रामहरी भुजंगराव लाड यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करीत आहेत.