क्रिकेटर शमीच्या पत्नीस बलात्काराची धमकी!
10 Aug :- भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलन्दाज महुंमद शमीच्या पत्नीने फेसबुकवर अयोध्या राममंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारं पोस्टर शेअर केलं होतं. यावर त्यांनी हिंदू समाजाला राममंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.काहींनी त्यांच्या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी अत्यंत वाईट शब्दात कमेंट करीत त्यांची हत्या आणि बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
त्यांच्या या फेसबुक पोस्टवर हसीन जहां यांना काही वापरकर्त्यांनी अपशब्दाचा वापर करीत कमेंट केली आहे. काहींनी तर बलात्काराची धमकी दिली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवर अत्यंत वाईट शब्दात प्रतिक्रिया करण्यात आल्या आहेत. याबाबत हसीन जहां यांनी कोलकत्ता पोलीस मुख्यालय लाल बाजार जाऊन तक्रार दाखल केली आहे.
यानंतर हसीन जहां यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विट करीत धमकी देणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.5 ऑगस्ट रोजी झालेल्या राममंदिर भूमिपूजनामुळे देशभरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हसीना जहां यांनीही आपल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन राममंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
हसीना जहां यांनी धमकी देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबरोबरच सुरक्षा देण्याचीही मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हसींना म्हणाली की, हे प्रकरण पंतप्रधान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यासमोर आणलं असून यावर ते कारवा करतील यावर विश्वास आहे.