प्रियसीसाठी ‘त्याने’ केले लाखोंचे दागिने लंपास!
9 Aug :- प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असा म्हणावाच आहे.मग नव्याने प्रेमात पडणारी तरुण कुठल्याच परिणामांची पर्वा न करता अनेक विचित्र गोष्टी प्रेमामध्ये करतात आणि मग विचित्र परिणामांना सामोरे जाऊन स्वतःचे आयुष्य खराब करून घेतात.अशीच एक घटना जौनपुरमध्ये घडली आहे.
प्रियकराकडे प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्याने साथीदारांसह दुकान लुटण्याचा प्लान केला.प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं. प्रियकराने साथीदारांसह सराफाच्या दुकानावर धाड मारली आणि तब्बल 10 लाखांचे दागिने लंपास केले.
6 जणांनी सराफाच्या दुकानात धाड मारली असून यातील 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रियकराकडे प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्याने साथीदारांसह दुकान लुटण्याचा प्लान केला.