बीड

बीड ऍन्टीजन तपासणी ; १३१ रुग्ण पॉझिटिव्ह!

10 Aug :- बीड शहरात सर्वत्र कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य स्थापित झाले आहे.रोज धक्कादायक येणाऱ्या रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक चिंतेत पडले आहेत.दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.बीड जिल्ह्यात अनेक भागात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत.मात्र बीड जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन फक्त नावा पुरतेच आणि कागदपत्रीच असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

अशा भयाण परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऍन्टीजन तपासणी आहवाल प्राप्त झाले आहेत. आज बीड शहरात तब्बल एकूण १३१ नवे रुग्ण आढळले आहेत.