IPL च्या रणांगणात उतरणार ‘पतंजली’
देशामध्ये अत्यंत लोकप्रिय असणारे आयपीएलचे रोमांचकी सीजन होणार असल्याचे जाहीर झाले आणि देशभरात क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर म्हणजेच युएइमध्ये होणार आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होणार असली तरी अद्याप BCCIकडे या स्पर्धेसाठी स्पॉन्सर नाही आहेत. बीसीसीआयनं चिनी कंपनी वीवोकडून मुख्य प्रायोजकत्व काढून घेण्यात आले.
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयपीएल मुख्य प्रायोजकसाठी बोली लावू शकतात. इकनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजरवाला यांनी सांगितले की, “आम्हाला पतंजली हा जागतिक ब्रँड बनवायचा आहे आणि म्हणूनच आम्ही आयपीएल प्रायोजकत्वाबद्दल विचार करीत आहोत”. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं वीवोकडून प्राजोकत्व काढून घेतल्याची घोषणा केली होतीतज्ज्ञांचे मत आहे की पतंजली हा जागतिक ब्रँड नाही. जर त्यांना आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व मिळाले तर त्यांना नक्कीच फायदा होईल.
विवोनंतर जिओ , अॅमेझॉन (Amazon), टाटा ग्रुप , ड्रीम 11 आणि बायजू या कंपन्यांही आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वाच्या शर्यतीत आहेत. बीसीसीआय आयपीएल -13 च्या नवीन प्रायोजकांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि नवीन प्रक्रियेचे अनुसरण करणार आहे. त्यामुळे प्रायोजकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया पाळली जाईल.