माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोनाच्या घेऱ्यात!
कोरोना विषाणूचा कहर सर्वत्रच धुमाकूळ घालत आहे. असुक्षित स्थळी कोरोनाचा शिरकाव होणे साहजिक आहे.मात्र सुरक्षित स्थळी देखील कोरोनाचा शिरकाव हे आश्चर्यस्पद आहे. कोरोना विषाणूची लागण सर्व सामान्य माणसांसह मोठे सेलिब्रेटी,अभिनेते,राजकीय नेते,प्रशाकीय अधिकारी,खेळाडू या सर्वाना झाली आहे. आता नव्याने माहिती समोर आली आहे की माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहले की, इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात कोरोना चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.