सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियांका यांच्या भेटीनंतर चर्चेला जोर
जयपूर, 10 ऑगस्ट : राजस्थानात विधीमंडळाचे सत्र सुरू होण्यापूर्वीच राजकीय हालचालींची गती वाढली आहे. पक्षासोबत बंडखोरी करणारे सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. सांगितले जात आहे की तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक राहिली. अशात सचिन पायलट यांना पुन्हा पक्षात रुजू करण्यामध्ये प्रियांका आणि राहुल गांधी यशस्वी राहिल्याचे संकेत आहेत.
14 ऑगस्टपासून राजस्थानात विधानसभा सत्र सुरू होणार असून त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी सत्रात सहभागी होण्याची संकेत देण्यात आले आहेत.
प्रियांका आणि राहुल यांच्या भेटीनंतर सचिन पायलट राग सोडून पुन्हा पार्टीत सहभागी होतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. यापूर्वी सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती, तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासोबत अनेकदा फोनवर चर्चा केली आणि प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला.
अशोक गेहलोत आणि सचिन पायलटमध्ये अंतर
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांच्यासह तब्बल 22 आमदार होते. राज्य सरकारने त्यांच्यावर सरकार पाडण्याचा आरोप लावला होता. शिवाय राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे सचिन पायलट नाराज होते. त्यांच्या बंडखोरीनंतर सचिन यांना उपमुख्यमंत्री-प्रदेश अध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप लावला होता की सचिन पायलट भारतीय जनता पक्षासोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते. यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली. येत्या काही दिवसात सचिन पायलट पुन्हा पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात खरच पायलट काँग्रेसमध्ये पुन्हा जागा बनवू शकतात के हे पाहणे औत्सुक्याचे आहे.