बीड

कोरोनाचा कहर काही थांबेना;233 रुग्ण पॉझिटिव्ह!

बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य स्थापित झाले आहे.रोज धक्कादायक येणाऱ्या रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक चिंतेत पडले आहेत.दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.बीड जिल्ह्यात अनेक भागात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत.मात्र बीड जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन फक्त नावा पुरतेच आणि कागदपत्रीच असल्याचे चित्र दिसून येत आहेत.अशा भयाण परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कालचे आहवाल आज प्राप्त झाले आहेत. म्हणजे काल बीड जिल्ह्यात तब्बल एकूण 233 रुग्ण आढळले आहेत.