बीड

तुम्ही,शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही -छत्रपती संभाजी राजें

9 Aug :- जनमाणसांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही. महाराजांचा सन्मान हा संपूर्ण हिंदुस्थानची जनता करते. बेळगावच्या शिवभक्तांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे.’, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी ट्वीट करत बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटक सरकारने वेळीच जागे व्हावे. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी. कर्नाटक सरकारने चूक सुधारावी, असा सज्जड इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. एवढंच नाही तर या देशाची संस्कृती टिकली ती महाराजांमुळे. कधीकाळी संपूर्ण कर्नाटक महाराजांच्या घोड्यांच्या टापाखाली आला होता, आज कर्नाटक जरी वेगळं राज्य असलं तरी आपली संस्कृती एकच आहे, याबाबतही खासदार संभाजी राजे यांनी कर्नाटक सरकारला आठवण करून दिली आहे.

आपण सर्व जण भारतीय आहोत. आपण सर्वांनी भारतियत्वाची भावना जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. शिवछत्रपती हे राष्ट्रभावनेचे मूलाधार आहेत. कर्नाटकातले देश बांधव सुद्धा महाराजांवर प्रेम करतात हा आमचा अनुभव आहे, असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

*धावपळीच्या आयुष्यात टीव्हीवर बातम्या पाहणे शक्य होत नाही ना..!*

https://chat.whatsapp.com/FwpGngIHiGo5H9MFgRw14S

#चला_तर_मग,
#जगभरातील_घडणाऱ्या_घडामोडींचं _मिळवा_खात्रीशीर_ताज्या_बातम्यांचे _अपडेट_आपल्या_वॉटसअँपवर!*

#दै.#झुंजारनेता_लाईव्ह_ग्रुपची_लिंक_प्रेस #करून_त्वरित_ग्रुप_ज्वाईन_करा!