महाराष्ट्र

कोरोनामुक्तीची पावती भेटलेल्या रुग्णांची संख्या उच्चांकी!

9 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहेच मात्र रुग्णवाढीपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.दिवसेंदिवस रुग्ण अरे होण्याची वाढती आकडेवारी प्रशासनाला आणि नागरिकांना दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या धास्तीने अनेक नागरिकांनी आत्महत्या केल्या असल्याचा प्रकार देखील घडला आहे.

आज राज्यात पहिल्यांदाच तब्बल 13,348 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 लाख 51 हजार 710 एवढी झाली आहे. तर नव्या रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसभरात 12,248 नवीन कोरोना रुग्ण नोंद झाली.

आज राज्यात 390 रुग्णांचा मृत्यू. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के एवढे आहे. राज्यात आज 10 लाख 588 व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरण यात आहेत तर 34 हजार 957 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यामध्ये आहेत. राज्यात एक लाख 25 हजार 558 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.