बीड अँटीजेन तपासणी;106 रुग्ण पॉझिटिव्ह!
9 ऑगस्ट :- बीड शहरात रोज वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस सर्व सामान्य नागरिकांना अनेक संकटांशी संघर्ष करण्यास मजबूर करत आहे. कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी कालपासून बीड शहरात सहा केंद्रावरून अँटीजेन तपासणी करण्यात येत असून या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी, व्यवसायिक, त्यांचे कर्मचारी, दूध, फळभाजी विक्रेते येत आहेत.
आज दि. 9 ऑगस्ट च्या दिवसभरात सहा केंद्रांवर 2520 जणांच्या अँटीजेन तपासण्या झाल्या असून यामध्ये 106 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आढळून आले आहेत.