Recent News

स्मशानभूमीमध्ये केले ‘हे’ क्रूर कृत्य;आणि मग…

9 Aug :- एकीकडे कोरोना विषाणूचा कहर आणि दुसरीकडे समाजामध्ये घडणाऱ्या संतापजनक विचित्र घटनांमुळे नागरिकांमध्यें भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना लोहरदगा जिल्ह्यात घडली आहे. स्मशानभूमीत अज्ञातांनी एका नवजात बाळाला जिवंत पुरले. मात्र रात्री अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाळाचे प्राण वाचले. सध्या हे नवजात सुरक्षित असून, येथील एका कुटुंबाच्या घरी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुरू पोलिस स्टेशन परिसरातील आहे.

येथील चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी एक जिवंत नवजात बाळाला पुरण्यात आले. नवजात बाळाला दफन केल्याची माहिती मिळताच जवळपासचे गावकरी एकत्र आले. असे सांगितले जात आहे की, स्मशानभूमीजवळून जात असताना एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. या व्यक्तीनं घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा एक नवजात बाळ मातीत अर्धे पुरले असल्याचे दिसून आले. यानंतर, त्याने नवजात बाळाला सुखरूप बाहरे काढले, आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला.