राजकारण

माजोड्या चीनला शिकवणार धडा; गडकरींनींचा गौप्य्स्पोट!

8 Aug :- भारत-चीन सीमेवर आव्हान देणाऱ्या चीनला दणका देण्यासाठी भारत सरकारकडून सैन्यासह आर्थिक बाबतीतही बरीच तयारी केली जात आहे. चीनहून विविध प्रकारे येणाऱ्या सामानांना प्रतिबंधित सूचीत समाविष्ट करण्यात आलं आहे. आणि आता अनेक वस्तुंवर आयात शुल्क वाढविण्याची तयारी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की विशेष करुन स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी भारताला त्या भागातील आयात शुल्क वाढविण्यासाठी विचार करायला हवा, ज्यामध्ये आयात केलेल्या वस्तुंवर सर्वाधिक अवलंबून आहेत.

गडकरींनी सीआयआयच्या कार्यक्रमात सांगितले की ‘ कदाचित तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही, मात्र काही प्रकरणात आपल्याला आयात शुल्क वाढवावे लागतील. जोपर्यंत आपण चीनप्रमाणे उत्पादन वाढवत नाही, तोपर्यंत किंनत वाढणार नाही. यासाठी आपल्याला ड्यूटी वाढवावी लागेल आणि भारतीय मॅन्युफॅक्चरर्सृना वाढवावे लागेल. जेव्हा जास्त प्रमाणात उत्पादन होतं, तेव्हा स्वाभाविक स्वरुपात आपण याला प्रतिस्पर्दी बनू शकतो.