बीड

बीड अँटीजन तपासणी; 86 रुग्ण पॉंझिटिव्ह!

बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मा जिल्हाधिकारी,बीड यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यवसायीक व कामगार वर्ग यांची अॅन्टीजन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आलेले होते. सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामध्ये १.बलभिम महाविद्यालय,बीड २.माँ वैष्णो देवी पॅलेस, एम.आय.डी.सी.रोड, बीड ३.जिल्हा परिषद शाळा ,अशोक नगर, बीड, ४.राजस्थानी विद्यालय,विप्रनगर,बीड ५.चंपावती प्राथमिक शाळा,बुथ क्र. १ नगर रोड, बीड ६.चंपावती प्राथमिक शाळा,बुथ क्र.२ नगर रोड,बीड या ठिकाणांचा समावेश होता. सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ९४

कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. बीड शहरातील ६ तपासणी केंद्रावर २६०१ व्यावसायिकांची कोविड-१९ निदानासाठी Antigen Test तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये ८६ लोकांना कोरोनाची ला झाल्याचे आढळूल आले. लागण झालेल्या ८६ नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामूळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यात मदत होणार आहे.