भारत

सुखद! भारतामध्ये १४ लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

8 Aug :- जगभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे.देशात देखील कोरोनाचा हाहाकार जोरात सुरु आहे.मात्र इतरत देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा कहर बेअसर असल्याचे चित्र दाखवणारी सुखद आकडेवारी समोर येत आहे.भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या चिंताजनक असली तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा सुखावणारी आहे.देशाचा रिकव्हरी रेट वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

शनिवारपर्यंत देशात 14.2 लाख जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट हा 68.32वर गेला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.तर देशातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही कमी करण्यात यश मिळालं असून त्याची टक्केवारी 2.04 एवढी झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचला आहे.

मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 48900 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. 15 जूनपर्यंत 51. 08 रिकव्हरी रेट होता तो वाढून 68.32 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.