बीड

बीड अँटीजन तपासणी;55 रुग्ण पॉंझिटिव्ह!

8 Aug :- बीड शहरातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून तपासणीला सुरूवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 1370 दुकानदार,व्यापारी,कामगार यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये 55 रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले.

शहरातल्या 6 केंद्रावर तपासणी होत आहे. बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी शहरात भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घेतला.

शहरातील जे काही व्यापारी किरकोळ विक्रेते, दुकानावर काम करणारे कामगार आणि दूध व्यवसायिक यांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज दि.8 सकाळपासून 6 केंद्रावर टेस्टला सुरूवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 1370 व्यापाऱ्यांची तपासणी केली असून यामध्ये 55 रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आलेले आहेत.