बीड

‘सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे’

मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) रियाची तब्बल 8 तास चौकशी केली. सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी असे आरोप केले आहेत की, रिया आणि कुटुंबीयांनी सुशांतच्या खात्यातून पैसे काढले आहेत. तिने 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप त्यांनी पाटणामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला होता.

आता रियाने तिच्याकडे असणाऱ्या सुशांतच्या संपतीचा खुलासा केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आता एक सिपर आणि डायरीतील एक पान शेअर केले आहे. या सिपरवर ‘छिछोरे’ असे लिहण्यात आले आहे. अभिनेत्रीने असा दावा केला आहे की, हा सिपर हिच केवळ सुशांतची संपत्ती माझ्याकडे आहे. सुशांतने या डायरीमध्ये तो कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे, याची यादीच लिहिली आहे. रियाने हे फोटो शेअर केले आहेत.

ईडीने रियाकडून तिच्या मालमत्तेची कागदपत्रं मागितली होती. मात्र रियाने आपली मालमत्तेची कागदपत्रं ईडीसमोर सादर केली नाहीत. तिनं आपली कागदपत्रं सीए रितेश शाहकडे असल्याचं सांगितलं मात्र रितेश शाह यांनीदेखील आपल्याकडे कागदपत्रं असल्याचं नाकारलं. त्यानंतर रियाने आपण कागदपत्रं कुठे ठेवलीत हे आठवत नसल्याचं सांगितलं. अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केल्यात. तिच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर या प्रॉपर्टी आहेत. दरम्यान News18 च्या सूत्रांनुसार शुक्रवारी रियाने अशी माहिती दिली की तिच्या नावावर 3 कंपनी देखील आहेत. मात्र इतर प्रश्नांची उत्तरे देणे तिने टाळले आहे. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे ‘मला माहित नाही’ किंवा ‘मला कसं तरी होत आहे’, अशी दिलीत.