भारत

…आणि गांधींची भविष्यवाणी खरी ठरली!

7 Aug :- देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव देशाची मोठी डोकेदुखी ठरली आहे.देशात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना प्रत्येकाच्या मनास सुखावणारी गोष्ट म्हणजे एकच कि भारतामध्ये रुग्ण बरे होण्याची संख्या सुद्धा जास्त आहे.इतरत देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाचा जास्त असर नाही झाला.कोरोनाचे संक्रमण वाढते असले तरी रुग्ण बरे होण्याच्या वेगही चांगला असल्याने भारतातील कोरोनावर नियंत्रणात आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागच्या महिन्यात केलेले भाकीत खरे ठरले आहे.

‘देशात 10 ऑगस्टपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांवर जाईल,’ असे भाकित राहुल गांधींनी केले होते. यासंदर्भात त्यांनी 17 जुलै रोजी ट्वीट केले होते, त्यांचे हे भाकीत तीन दिवसांपूर्वीच खरे झाले आहे. देशातील कोरोना रुग्णांनी 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशभरात 20.46 लाखांवर कोरोना रुग्ण आहेत.

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 20.46 लाखांव गेला आहे. शुक्रवारी सकाळी 20 लाख 27 हजार 746 केस समोर आले आहेत. गुरुवारी एका दिवसात 62 हजार 170 रुग्ण वाढले. हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित सापडले.