फक्त 225 रुपयात मिळनार कोरोनाची लस!
5 Aug :- कोरोना विषाणूने जगभरातील मानवी आयुष्य विस्कळीत करून ठेवले आहे.जगभरात अनेक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यूला देखी कवठाळा लागले आहे.जगभरातील अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडण्यात कोरोना विषाणू यशस्वी ठरला आहे.या कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता जगभरात प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.देशात ऑक्सफोर्डची व्हॅक्सीन तयार करणाऱ्या सीरम इंस्टीट्यूटकडून एक चांगली बातमी आली आहे.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि व्हॅक्सीन अलायंस संस्था गावीसोबत एक करार केला आहे. या करारानुसार, भारत आणि कमी उत्पन्न असलेल्या 92 देशांना फक्त 3 डॉलर म्हणजेच 225 रुपयात व्हॅक्सीन देण्याचे ठरवले आहे.गेट्स फाउंडेशन व्हॅक्सीनसाठी गावीला फंड उपलब्ध करुन देईल, याचा वापर सीरम इंस्टीट्यूट व्हॅक्सीन तयार करण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यसाठी करेल.
व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल यशस्वी झाल्यानंतर लस बाजारात उपलब्ध होईल. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.