भारत

धक्कादायक;भारतात येणाऱ्या विमानाचा भीषण अपघात!

7 Aug :- यंदाचे २०२० हे वर्षच महाशापित असल्यागत वाटू लागले आहे.आनंदायी घटनांचा वणवा पडल्यागत जाहले आहे.एका पाठोपाठ विचित्र,धक्कादायक घटना घडत आहेत.आताच हाती आलेल्या माहितीनुसार केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात घडून आला आहे. हे विमान धावपट्टीवरून वरून घसरले असून विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

या विमानात तब्बल 170 प्रवासी होते.एक्स 1344 हे विमान ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत दुबईहून भारतात येत होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा भीषण अपघात झाला झाला आहे.कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यात इथे पाऊस होता. त्यामुळे कदाचित पायलटला अंदाज आला नसावा.

त्यामुळे 30 फूट खाली ते घसरलं आणि त्यातून हा अपघात झाला.विमान लँड होत असताना धावपट्टीपासून काही अंतरावर ते घसरले. कोझिकोडमध्ये गेले 24 तास प्रचंड पाऊस पडतो आहे. या पावसामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.कळलेल्या प्राथमिक बातमीनुसार, वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. 32 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.