क्रीडा

भारतात रंगणार T-20 विश्व्चषकाचा महासंग्राम!

7 Aug :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले आहे.क्रिकेट मधील अनेक मोठ्या सिरीज काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.दरम्यान क्रिकेट प्रेमींसाठी सुखद वार्ता समोर आली आहे.आवडर IPL ची घोषणा आणि नंतर लागलीच आता टि-20 विश्वचषकाबाबत सुखद बातमी मिळाली आहे.पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये भारतात टी-ट्वेण्टीचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मागील टी-ट्वेण्टी वर्ल्डकप 2016 झाला होता. त्यानंतर 2020 मध्ये ही स्पर्धा होणार होती. मात्र कोरोना व्हायरस थैमानाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होऊ शकणार नाही.दुसरीकडे, पुढच्या टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचीही घोषणा करण्यात आली असून हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये 2022 साली खेळवण्यात येणार आहे.भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात IPL चा यंदाचा सीझन लांबणीवर पडला.

मात्र काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या तारखांची अधिकृत माहिती देण्यात आली असून आयपीएलचा यंदाचा सीझन 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे.