सिनेमा,मनोरंजन

सोनू सूद देणार 1 लाख गरजूंना नोकऱ्या

7 Aug :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रय अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी चर्चेत असलेला सूनू सूद प्रत्यक्ष आयुष्यात समाजकार्यातून हिरोची प्रतिमा उमटवत असल्याचे दिसून येत आहे.सध्य परिस्थितीमध्ये वारंवार माणुसकीचं विराट दर्शन सोनू सूदच्या कार्यातून मिळत आहे.कोरोना महामारीच्या संकटात आपल्या कार्याने लोकाचें मन जिंकत आहे. सोनुने परराज्यात अडकलेल्या हजारो कामगारांना घरी जाण्यासाठी मदत केली. त्यानंतर आता अनेकांना रोजगार मिळवून देण्यास मदत करत आहेत.

सोनू सूदने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 30 जुलैला 3 लाख नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. सोनूने ट्विट केले होते की, माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने माझ्या प्रवासी भावांसाठी pravsirojgar.com चे 3 लाख नोकऱ्या देण्याचे वचन. हे सर्व चांगला पगार, पीएफ, ईएसआय आणि अन्य लाभ प्रदान करतात. धन्यवाद एईपीसी, सिटी, ट्रिडेंट, क्यूस कॉर्प, अ‍ॅमेझॉन, सोडेक्सो, अर्बन, पोर्टिया आणि इतर सर्वांचे.सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात केवळ भारतीयच नाही तर, परदेशात अडकलेल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी देखील मदत करत लोकांचे मन जिंकले आहे.