महाराष्ट्र

दुर्दैवी अंत्यविधी;’त्या’ मृतदेहावर नगरपालिकेनेच केले अंत्यसंस्कार!

7 Aug :- कोरोना विषाणूने मानवी जीवन पूर्णतः विस्कळीत करून टाकले आहे.माणूस माणसाशीच भेटू शकत नाही.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लग्नसमारंभ,अंत्यविधी,वाढदिवस,धार्मिक कार्यक्रम आशा कुठल्याही कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही.कोरोनाअभावी मृत पावलेल्या कित्येक रुग्णांचा अंत्यविधी स्वतः नगरपालिकेने केला आहे.यापेक्षा दुर्दैव दुसरे कुठलेही नाही कि अंत्यविधीसाठी त्याच्या घरातल्या माणसांना सुद्धा उपस्थित राहता येत नाही.अशीच एक दुर्दैवी घटना पंढरपूरमध्ये घडली आहे.

पंढरपुरातील एका चहावाल्याचा बुधवारी मृत्यू झाला होता़ त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी कोरोना टेस्ट केली़ यामध्ये चहावाला पॉझिटिव्ह आला़ त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने त्याला शहरातील केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी अहवाल आल्याशिवाय उपचार सुरू करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचे नातेवाईक अहवालाच्या प्रतीक्षेत बसले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.


संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला़ ही माहिती मिळताच नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली नातेवाईकांनी त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिला, त्यानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी त्या चहावाल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांनी तक्रार केलेला अर्ज चौकशीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.