बिल गेट्स यांची भविष्यवाणी; ‘या’ महिन्यात येणार कोरोना लस!
5 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरात सर्वत्र थैमान घातले आहे.कोरोना विषाणूने जगभरातील अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून काढले आहे.प्रषासनासह नागरिकांमध्ये सुद्धा कोरोना विषाणूची भीती निर्माण झाली आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळी सुरु आहे.जगभरातील देश कोरोनावर मात करणारी प्रभावी लस तयार करत आहेत.दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही कोरोना वॅक्सिनबाबत माहिती दिली आहे.
बिल गेट्स म्हणाले की, कोरोना वॅक्सिन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल. तसंच हे वॅक्सिन पहिल्यांदा श्रीमंत देशांना मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय हे वॅक्सिन कोरोनाविरुद्ध प्रभावी ठरेल की नाही याबद्दलही शंका आहे.सुरुवातीला वॅक्सिन जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता कमी आहे. याचा प्रभाव दिसण्यास वेळ लागू शकतो. अमेरिकेला या प्रकरणी जागतिक परिस्थितीचा विचार करावा लागेत.
जगाचं हितही त्यांनी बघायला हवं.अमेरिकेच्या खासदरांना बिल गेट्स यांनी आवाहन केलं आहे की, त्यांनी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना कोरोना वॅक्सिन खरेदी करण्यासाठी 8 अब्ज डॉलर द्यावं. गेट्स म्हणाले की, फक्त श्रीमंत देशांमधूनच नाही तर गरीब देशांमधूनही कोरोना नष्ट व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. बिल गेट्स यांची संस्था बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने कोरोनाशी संबंधित संशोधनासाठी 25 कोटी डॉलरची मदत दिली आहे.
एवढंच नाही तर गेट्स एस्ट्राजेनेका, जॉनसन अँड जॉनसन आणि नोवावॅक्स तयार करत असलेल्या कोरोना लसासाठी अर्थसहाय्य करत आहेत.गेट्स यांनी सांगितलं की, कोरोना वॅक्सिनशिवाय रुग्णांच्या उपचारांसाठी औषधे तयार केली जात आहेत. त्यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. कोरोना व्हायरसच्या चाचणीमध्ये उपचारांचा शोध आणि वॅक्सिनसाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत जगात 2021 अखेरपर्यंत कोरोनाची साथ नष्ट होईल अशी आशा आहे