भारत

कोरोना मात करण्यासाठी काविळीचं औषध प्रभावी!

6 Aug :- आल्पदिवसांमध्ये सर्व जगावर स्वतःच साम्राज प्रस्थापित करून भूतलावरील बुद्धिमान मनुष्य प्राण्यास वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी काविळीचं औषध प्रभावी आल्याचा दावा भरतील काही तज्ज्ञांनी केला आहे.कोरोनाव्हायरवर विविध आजारांवरील औषधाने उपचार केले जात आहेत आणि त्यापैकी काही औषधांचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. आता हेपेटायटिस- सीचं Hepatitis-C औषधही कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम ठरेल, असा दावा भारतातील तज्ज्ञांनी केला आहे.

Hepatitis-C चं औषध घेणाऱ्या रुग्णांवर कोरोनाचा काहीच परिणाम होत नाही आहे, असा दावा रोहतक पीजीआयने केला आहे.कित्येक देशांमध्ये या औषधाचं ट्रायल सुरू आहे, भारतातही यावर संशोधन सुरू आहे. रोहतक पीजीआयमध्ये हे औषध घेणाऱ्या 2000 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी कुणावरही कोरोनाचा परिणाम दिसून आला नाही.रोहतक पीजीआयमध्ये हेपेटायटिस-सीचं स्टेट नोडल ट्रिटमेंट सेंटर आहे. या सेंटरचे इंचार्ज डॉ. प्रवीण मल्होत्रा यांनी सांगितलं, “ब्रिटन, ब्राझील, इराण आणि सौदी अरब या देशांमध्ये हेपेटायटिस-सीची प्रकरणं असल्याचं दिसून आलं आहे. हेपेटायटिस औषध घेणाऱ्या रुग्णांवर कोरोनाचा परिणाम दिसून आला नाही”

“हरयाणामध्ये गेल्या चार महिन्यात जवळपास 5000 हेपेटायटिस-सीचे रुग्ण औषध घेत आहेत आणि आम्ही त्यावर रिसर्च करत आहोत. आतापर्यंत 2000 रुग्णांचा डेटा पाहिला आणि यापैकी कोणत्याही रुग्णामध्ये कोरोनाचे लक्षण दिसले नाहीत”, असं त्यांनी सांगितलं. हा अभ्यास निरीक्षणावर आधारित आहे, मात्र कोरोनाव्हायरसविरोधात लढण्यात हेपेटायटिसवरील औषध सक्षम ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.रोहतक पीजीआयमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हेपेटायटिस-सीच्या औषधाच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे आणि त्यासाठी 86 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ओपी कालरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जगभरात पाच देशांमध्ये हेपेटायटिस-सीच्या औषधांचं कोरोना रुग्णांवर ट्रायल करण्यात आलं, ज्याचे परिणाम सकारात्मक आले. त्यानंतर आता रोहतक पीजीआयमध्येदेखील ट्रायल करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडे परवानगी मागण्यात आली होती”