महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा उद्रेक;रुग्णवाढ उच्चांकी!

5 Aug :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य स्थापित झाले आहे.रोज धक्कादायक येणाऱ्या आकडेवारीमुळे प्रशासन,नागरिक चिंतेत पडले आहेत.दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे राज्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.गेल्या २४ तासांमध्ये 10,309 नवे रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यातच पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,68,265 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 16,476 वर गेला आहे. दिवसभरात 334 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यभरात उपचार सुरू असलेले तब्बल 1,45,961 रुग्ण आहेत.ए

कीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.52 एवढा झाला आहे.