रशिया निर्मित कोरोना लशीवर WHO चा महत्वपूर्ण खुलासा!
5 Aug :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभरात सर्वत्र थैमान घातले आहे.कोरोना विषाणूने जगभरातील अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून काढले आहे.प्रषासनासह नागरिकांमध्ये सुद्धा कोरोना विषाणूची भीती निर्माण झाली आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळी सुरु आहे.जगभरातील देश कोरोनावर मात करणारी प्रभावी लस तयार करत आहेत.मात्र वारंवार रशियाने लस तयार केल्याचा आणि प्रभावी लस तयार झाल्याचा प्रबळ दावा केला आहे.
रशियाने आपल्या कोरोना लशीचे सर्व क्लिनिकल ट्रायल संपल्याची घोषणा केली आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं आहे. ही आनंदाची बातमी आहे मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं या लशीच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.रशियाने लस बनवण्यासाठी गाइडलाइन्सचं पालन केलेलं नाही, त्यामुळे लशीच्या यशस्वीतेवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. रशियाने कोरोना लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल केलेलं नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल न करताच त्याच्या उत्पादनासाठी परवाना दिला जात असेल तर हे धोकादायक ठरू शकतं, असं WHO च्या प्रवक्त्या क्रिस्ट्रियन लिंडमियर यांनी यूएन पत्रकार परिषदेत सांगतिलं.
क्रिस्टियन लिंडमियर म्हणाल्या, “अनेकदा काही संशोधक दावा करतात की त्यांनी नवा शोध लावला आहे आणि ही चांगली बातमी असते. जेव्हा अशा लशींबाबत बातम्या येतील किंवा अशी पावलं उचलली जातील तेव्हा आपल्याला सावध राहायला हवं. अशा बातम्यांबाबत तथ्यता पडताळून घ्यायला हवी. एखादा शोध लावणं किंवा लस परिणामकारक असल्याचे संकेत मिळणं आणि क्लिनिकल ट्रायलच्या सर्व टप्प्यांमधून जाणं यामध्ये खूप मोठा फरक आहेत. आम्हाला अधिकृतरित्या असं काहीच दिसलं नाही. तर अधिकृतरित्या असं काही झालं असतं तर युरोपमधील आमच्या सदस्यांनी याकडे जरूर लक्ष दिलं असतं”
“एक सुरक्षित लस तयार करण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत आणि याबाबत गाइडलाइन्सदेखील आहेत. याचं पालन करणं गरजेचं आहे जेणेकरून लस किंवा कोणताही उपचार किती परिणामकारक आहे आणि कोणत्या आजाराविरोधात लढण्यात मदत करू शकेल हे आपल्याला समजू शकेल. गाइडलाइन्सचं पालन केल्यानं आपल्याला एखादा उपचार किंवा लशीचे दुष्परिणा काय आहेत तेदेखील समजतं”जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या वेबसाइटवर क्लिनिक ट्रायल सुरू असलेल्या 25 लशींची यादी तयार केली आहे. आतापक्यंत 139 लशी प्री-क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे.