महाराष्ट्र

भूमिपूजनानिमित्त आमदार वाटणार 10 लाख लाडू!

5 Aug :- देशाच्या राजकारणात गेली अनेक वर्ष रखडलेला वाद संपून अखेर राम मंदिराचे भूमिपूजन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झाले.देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आहेत त्या ठिकाणांहून राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पाहावा असे आवाहन भाजपकडून करण्यात आले होते.सर्व नागरिकांनी घरबसल्या राम मंदिर भूमोपूजनाचा मनसोक्त आनंद घेतला.दरम्यान राम मंदिर भूमिपूजननिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये 10 लाख लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र, पोलिसांनी यावर आक्षेप घेतला असून आमदार लांडगे यांना कायदेशिर नोटीसही बजावली आहे.

श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ‘जय श्रीराम’चा नारा रामजन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल 10 लाख मोतीचूर लाडू वाटप करणार असून पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 40 प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, लाडू वाटपाचा कार्यक्रम घेऊ नये. त्यामुळे कायदा व्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि तस झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर असेल, हे लक्षात घेऊन कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

मात्र, इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याच सांगत सध्या तरी नोटीसीनंतर पुढील भूमिका काय असेल हे अद्याप आमदार लांडगे यांनी स्पष्ट केलेलं नाही.