बीड

कहर कोरोनाचा;बीड जिल्हयात मृत्यू झाला दोघांचा!

4 Aug :- बीड जिल्हयात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे.कोरोनाचे वाढते संक्रमण येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यावरील कोरोनारूपी मोठ्या संकटाचे संकेत देत आहे. कोरोनाबाधित रुग्णांबरोबर आता बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.कोरोनामुळे मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, धारूर शहरातील 70 वर्षीय वृद्ध दमा, शुगर सारख्या आजारावर उपचार सुरू असताना दि.23 जुलै रोजी त्यांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले होते. बाधीत अवस्थेत ते इतर आजारांशी झुंज देत असताना आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या धर्मापुरी येथील 65 वर्षीय वृद्धाचाही रात्री मृत्यू झाला आहे.