महाराष्ट्र

सुखद;रुग्णवाढी पेक्षा रुग्ण बरे होण्याचा उच्चांक!

4 Aug :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहेच मात्र रुग्णवाढीपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.दिवसेंदिवस रुग्ण अरे होण्याची वाढती आकडेवारी प्रशासनाला आणि नागरिकांना दिलासा देणारी ठरत आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या धास्तीने अनेक नागरिकांनी आत्महत्या केल्या असल्याचा प्रकार देखील घडला आहे.आज राज्यात पहिल्यांदाच तब्बल 12,323 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

आजपर्यंत राज्यात एकूण दोन लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.37 टक्के एवढे आहे. राज्यात आज 7760 नवीन रुग्ण सापडले. राज्यात आज तीनशे रुग्णांचा मृत्यू सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 52 टक्के एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 57 हजार 956 एवढी झाली आहे.राज्यात नऊ लाख 44 हजार 442 व्यक्ती घरात विलगीकरण आत आहेत तर 43 हजार 906 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यात आहेत.सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले.

गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली.कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत, अमेरिका आणि ब्राझील जगातील तीन सर्व प्रभावित देश आहे. मात्र यात भारतातील परिस्थिती चांगली आहे. भारताचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.