गलिच्छ राजकारण!सुशांत आत्महत्या प्रकरणी ठाकरेंनी सोडले मौन
4 Aug :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय,आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यस वैतागून गळफास घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली. दिड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.मात्र सुशांतच्या आत्महत्यांचे कारण स्पष्ट झाले आहे.हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते,दिग्दर्शकांची कसून पोलीस चौकशी झाली आहे.मात्र अद्यापही पोलिसांना सुशांत आत्महत्येचे कारण शोधण्यात यश आले नाही.
चित्रपट निर्माता,दिग्दर्शक करण जोहरचे नाव देखील सुशांत आत्महत्या प्रकरणात घेण्यात आले होते.मात्र करण जोहर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मित्र असल्यामुळे करण जोहरवर कार्यवाही झाली नाही असे आरोप अभिनेत्री कंगना राणोतने केली होती होती.यानंतर आदित्य ठाकरेंवर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली.या सर्व प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी अनेक दिवस मौन धरले होते.आज मात्र आदित्य ठाकरेंनी या सुशांत आत्महत्या प्रकरणाबाबत स्वतःवर झालेल्या आरोपाचे सडेतोड उत्तर देत मौन सोडले आहे.
महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, असे आदित्य यांनी म्हटले आहे.पुढे ते म्हणाले की, बॉलिवूडमधील अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही.
सुशांतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलिस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत. ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही, तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुराळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.