…अखेर हे गांधीही म्हणाले ‘राम’
4 Aug :- देशाच्या राजकारणात अयोध्येतील राम मंदिरावरून गेली अनेक वर्ष रंगलेला वाद संपून येत्या काही दिवसात राम मंदिर उभारण्यात येणार आहे.राममंदिराच्या भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.राम मंदिराच्या भूमिपूजनास २४ तासांपेक्षाही कमी वेळ राहिला आहे.देशात प्रत्येकजण राम नामात मग्न झाला आहे. त्या काँग्रेसलाही रामाची आठवण येत आहे,
खुल्या मंचावर या नावापासून दूर पळायची. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वधेरा यांनी मंगळवारी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी 21 ओळींमध्ये 270 शब्द लिहीले आहेत आणि यात 23 वेळा रामाचे नाव घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, नेहमी इंग्रजीत स्वाक्षरी करणाऱ्या प्रियंका यांनी यावेळीस हिंदीमध्ये स्वाक्षरी केली आहे.