देश विदेश

अबब..! कोरोनाच्या धास्तीने वॉशिंग मशिनमध्येच धुतल्या नोटा

4 Aug :- एकीकडे जगभरात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे.आणि दुसरीकडे कोरोना विषाणूची धास्ती मानवी मनावर परिणाम करत आहे.प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून सतत सांगण्यात येत आहे.बाहेरून घरात आल्यास स्वछ हात धुवा,बाहेरून आलेल्या प्रत्येक गोष्टीवर कोरोना विषाणू असण्याची शक्यता आहे.म्हणून शकतो बाहेरून येणाऱ्या वस्तू धुवून घ्या.व्हायरस हा कुठेही असू शकतो त्यामुळे हाताचा स्पर्श होतील अशा सगळ्या वस्तू या सॅनिटाईज करून घेतल्या पाहिजेत असा सल्ला डॉक्टर वारंवार देत आहेत.

कोरोनाच्या भीतीने माणसांच्या मनावर एवढा परिणाम झाला आहे कि दक्षिण कोरियातल्या एका व्यक्तीने चक्क आपल्याजवळ असलेल्या काही हजार नोटा चक्क वॉशिंग मशिनमध्येच टाकून धुतल्या.वॉशिंग मशिनमध्ये हजारो नोटा टाकून धुतल्याने संपूर्ण नोटांचा चुथडा झाला आहे.राजधानी ‘सोल’जवळ असलेल्या अनसॅन या शहरातली ही घटना आहे. इथे राहणाऱ्या एका गृहस्थांनी हे कृत्यू केलं. नंतर त्यांना आता पश्चाताप करावा लागतोय. नोटांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याने हा अघोरी प्रकार केला.

आपल्या जवळच्या काही हजार नोटा त्यांनी वॉशिंग मशिनमध्ये चक्क धुण्यासाठी टाकल्या.त्याचा व्हायचा परिणाम तोच झाला. त्यातल्या बहुतांश नोटा या फाटल्या तर राहिलेल्या मोजक्या नोटांचा पार रंग उडाला. हा प्रकार करून हे महाशय थांबले नाहीत तर त्या सर्व नोटा घेऊन ते बँकेत गेलेत आणि त्या नोटा बदलून देण्याची मागणी केली.झालेला प्रकार ऐकल्यानंतर त्या बँक अधिकाऱ्यानेही कपाळावर हात मारून घेतला. त्या नोटा एवढ्या खराब झाल्या होत्या की त्या बदलणे शक्यही नव्हतं. त्यामुळे त्या मोजण्याची तसदी सुद्धा बँकेने घेतली नाही.