भारत

चीनला झटका! इथून पुढे टीव्हीवर ‘चीन’ दिसणार नाही

4 Aug :- जागा आणि जगू दया या मानवतेच्या धर्मावर वाटचाल करणाऱ्या भारत देशाने माजोड्या चीनला अद्दल घडवण्यास चांगलीच सुरवात केली आहे.भारत देशाने चीनच्या चीन कडून येणाऱ्या अनेक प्रोडक्ट्सवर,मोबाईल अँप वर बहिष्कार टाकला आहे.भारताशी वाद करणाऱ्या चीनला चहूबाजूंनी अडचणीत आणण्याचे सक्षम पाऊल भारताने उचलल्याचे चित्र दिसू लागले आहे.निश्चितच भारतात राफेल आल्यानं आता आणखीन भारताची ताकद वाढली आहे. मोदी सरकारनं चीनकडून येणारी आयात रोखण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला त्यानंतर आणखी एक पाऊल उचलण्यात आल्यानं चीनला मोठा झटका बसला आहे.

गुरुवारी केंद्र सरकारने कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घातली. चीनच्यासारख्या देशातून टीव्ही खरेदी करून उत्पादनाला चालना देणे कमी करण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.

कलर टीव्हीसाठी आता DGFT कडून आयात करण्याचं वेगळं लायसन घ्यावं लागणार आहे. या लायसन्स नंतर चीनकडून आयात झालेले टीव्ही खरेदी करता येणार आहेत. याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया आणि इंडोनेशिया या देशांचाही यामध्ये समावेश आहे. याआधी भारतानं जवळपास 120 हून अधिक चीन अॅप आणि वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.