क्रीडा

Braking! रोहित शर्माची होणार कोरोना चाचणी

4 Aug :- कोरोनाचा कहर सर्वत्र देशात सुरु आहे. सर्व सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रेटी अभिनेते,कलावंत,राजकीय नेते,प्रशाकीय अधिकारी,खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत.कोरोना विषाणूचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे.अशा गंभीर परिस्थितीमध्ये देशात लोकप्रिय असणाऱ्या ipl च्या १३ हंगामाची तारीख निश्चित झाली आहे.आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे.

यंदाचा हंगाम 53 दिवस चालणार आहे.युएइमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुंबई संघाचे खेळाडू मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात सर्व संघासाठी आयपीएल गर्व्हनिंगच्या वतीने नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई इंडियन्स आपल्या खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करणार आहे.क्वारंटाइन करण्यात आलेले खेळाडू हे केवळ कोव्हिड टेस्ट करण्यासाठी बाहेर येऊ शकता. त्यांना एक रुममध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माची एक किंवा दोन वेळा नाही तर तब्बल पाचवेळा कोरोना चाचणी होणार आहे. केवळ रोहितच नाही तर इतर खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना युएइमध्ये जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.मुंबई इंडियन्सचा संघ 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी युएइसाठी रवाना होऊ शकते. याआधी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी होणार आहे.तसेच, खेळाडूंना 14 दिवसात चारवेळा कोव्हिड-19 चाचणी करावी लागणार आहे. पहिल्या दोन चाचण्या या युएइ जाण्याआधी करण्यात येणार आहेत. त्यानंतर युएइमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर कराव्या लागणार आहेत.संघांना एकवेळा हॉटेल निश्चित करून दिल्यानंतर त्यांना हॉटेल बदलण्याची मुभा नसेल.

बीसीसीआय निर्णय घेईल की कोविड चाचणीत निगेटिव्ह आलेले केटररच खेळाडूंना जेवण देतील.बाकीच्या नियमांनुसार डगआऊटमध्ये कमी लोकांना बसण्याची परवानगी असेल तर ड्रेसिंग रूममध्ये फक्त 15 खेळाडू असतील.कमेंट्री बॉक्समध्ये सामन्याचे समालोचक सहा फूट अंतर राखून असतील. सामन्यानंतरच्या सादरीकरणातही सामाजिक अंतर पाळले जाईल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, हा एसओपी पुढील आठवड्यात सर्व फ्रेंचायझीना पाठविला जाईल.