25 हजारांची गावठी दारु पकडली
3 Aug :- जुना जालना विभागातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या एका ठिकाणी पोलीसांनी धाड टाकून 25 हजार रुपये किंमतीची गावठी दारु, रसायनासह विदेशी दारु पकडली.जुना जालना भागातील स्वयंवर मगल कार्यालयाच्या बाजुला दारुबंदी विरोधी पथकांने धाड टाकून एका महिलेच्या ताब्यातून 24 हजार 420 रुपयांची गावठी दारु, रसायन व विदेशी दारू पकडली.
याप्रकरणी सदर महिलेच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत पवार,भिसे,आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे, दिपक पाटील, रवि मेहेत्रे,अलका केंद्रे,रतमाला एडके, चालक धोडीराम मोरे यांनी केली.