बेदम मारझोडीत व्यापारी गंभीर जखमी
3 Aug :- कंपनीतील क्रिकेट ग्राऊंडचा लाईट सुरू न केल्याने व खेळू न दिल्याने वॉचमनला मारहाण केल्यानंतर घरी जाणार्या वरद संदीप मुंदडा (रा. भरतनगर, जालना) या मालकास मोटार सायकलवर रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत बेदम मारझोड करणार्या 8 जणाविरूध्द सदर बाजार ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मारझोडीत वरद मुंदडा यांचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना 31 जुलै रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील कॉलेज रोड खर्डेकर कॉम्प्लेक्ससमोर घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
याबाबत वरद संदीप मुंदडा (रा. भरतनगर,जालना.) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी जुन्या एमआयडीसीत पाण्याच्या टाक्याची कंपनी आहे. तिथेच टफ क्रिकेट ग्राऊंड आहे. 31 जुलै 2020 रोजी कंपनीचा वॉचमन मदन ढेंगळे यांनी फोनवरून कळविले आपणास, शेख बशीम शेख नईम यांनी टफ ग्राऊंडवरील लाईट चालू न केल्याने मारहाण केली.त्यानंतर मी व माझा आत्याभाऊ सौरभ घनय्यामदास खरोड रा. औरंगाबाद कंपनीमध्ये गेलो. व रात्री परत 10.30 वाजता कॉलेज रोडने घरी जात असतांना, खर्डेकर कॉम्प्लेक्ससमोर एका अनोळखी व्यक्तीने मला थांबविले.व म्हणाला तुमच्या वाचमनने आम्हाला खेळू दिले नाही,तेव्हा मी म्हणालो वॉचनमनला का मारहाण केली, असे म्हणताच शेख वशीम शेख नईम व इतर 7 जणांनी शिवीगाळ करून,चापटाबुक्क्याने मारहाण केली.
तसेच अमीर हासमीन याने उजव्या डोळ्यावर व नाकावर मारून, नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. तसेच सौरभ यासही मारहाण केली.याबाबत वरद संदीप मुंदडा यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार ठाण्यात शेख वशीम शेख नईम, अमीर हासमीन, शेख अरबाज व त्याच्यासह अन्य 5 अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र वाघ हे करीत आहेत.