महाराष्ट्र

संशयावरून युवकाचा गळा चिरून खून!

3 Aug :- एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे समाजात घडणाऱ्या संतापजनक आणि विचित्र घटना हल्ली सर्व सामान्य नागरिकांचं जगणे मुश्किल करू लागल्या आहेत.कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व मेनी नागरिकांच्या हाताला काम नसल्याने सर्व सामान्य माणसाची मनोवृत्ती दिवसेंदिवस विक्षिप्त होत चालली आहे.म्हणूनच समाजामध्ये हत्येचं आणि आत्महत्येचं सत्र सुरु झाले आहे.

संशयावरून एका युवकाचा धारदार शस्त्राने मानेवर वार करून, त्याचा खून केल्याच्या आरोपावरून 3 जणाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना 2 ऑगस्ट रोजी जालना नुराजी मस्जीदजवळील पुलाजवळ कन्हैयानगरात घडली. मयत युवकाचे नाव मधुकर मनोहर पवार (रा. कन्हैयानगर जालना)असे आहे. याप्रकरणी मयत मधुकर पवार याची पत्नी वंदना पवार हिच्या फिर्यादीवरून कृष्णा वानखेडे, भज्या उर्फ अजय साबळे व एक महिला सर्व रा. कन्हैयानगर जालना यांच्याविरूध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहे.