महाराष्ट्र

मुर्तीच्या नाकातील नथ चोरी!

3 Aug :- एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे चोरट्यांनी दहशद हल्ली सर्व सामान्य नागरिकांचं जगणे मुश्किल करत आहेत.समाजात अनेक संतापजनक आणि विचित्र घटना घडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.जालना शहरातील आराध्य दैवत दादावाडी जवाहरबाग येथील आनंदेश्‍वर महादेव मंदीर बाजूला असलेल्या सतीदादी मातेच्या मंदीराच्या आतील मुर्तीच्या नाकातील 10 हजाराची 2 ग्रॅम वजनाची सोन्याची नथ अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

ही घटना 3 ऑगस्ट रोजी पहाटे घडली. याप्रकरणी संशयीत अनिल बाबू पवार वय 30 रा मिलनपूल झोपडपटी नांदेड याच्याविरूध्द सदर बाजार ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.