राजकारण

नवनीत राणांची दोन्ही मुलं कोरोनाच्या विळख्यात!

3 Aug :- देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.सर्व सामान्य माणसांसह मोठी मोठी सेलिब्रेटी,अभिनेते,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी सुद्धा कोरोनाच्या चपेटीत अडकले आहेत. काल खासदार नवनीत राणा यांच्या देखील घरात कोरोनाचा शिरकाव झाला होता.या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य व कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.आताच हाती आलेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमदार रवी राणा यांच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवारी समोर आले होते. यानंतर राणा कुटुंबातील आणि इतर संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात रवी आणि नवनीत राणा यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतू, मुलगा, मुलगी यांच्यासह कुटुंबातील 10 जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लक्षणे असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.