महाराष्ट्र

…अन कोविड रुग्णालयात रक्षाबंधन साजरे!

3 Aug :- कोरोना विषाणूचा कहर सर्वत्र सुरु असल्याने या वर्षीचा प्रत्येक सण-उत्सव साधेपणाने घरीच साजरा काण्यात आला.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र कोरोनाला न घाबरता कोरोनाशो लढण्याची वेळ असल्याचे नागरिक विसरत आहेत.कोरोनाच्या भीतीला बाजूला ठेवत कोविड रुग्णालयात एक अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

परिचारिकांना चक्क कोरोना रुग्णांकडूनच राख्या बांधल्या आहेत.रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण.. या सणाला भाऊ आपल्या बहिणी कडून राखी बांधून तिच्या सुरक्षेची हमी देतो.मात्र कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोविड रुग्णालयातील परिचारिका या रुग्णांची सुरक्षा ठेवत असून त्यांच्या आरोग्याची हमी घेत असल्याने रुग्णांकडून या परिचारिकांना राखी बांधून बुलडाणा जिल्ह्यात अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.

खामगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना योद्धा म्हणून आपली अहोरात्र सेवा बजावत रुग्णाची काळजी घेणाऱ्या परिचरिकांना कोरोना पॉझिटिव्ह महिला व पुरुष रुग्णांनाकडून राखी बांधून आपले रक्षाबंधन साजरे केले आहे. राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करतो. मात्र इथल्या आमच्या बहिणी आमची कोरोना पासून रक्षा करत असल्याने आम्हीच त्यांना राखी बांधत असल्याच्या भावना येथील रुग्णांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.