महाराष्ट्र

सावधान! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

3 Aug :- कोरोनाशी लढताना आता पावसाशी सुद्धा दोन हात करण्याची वेळ आली आहे.हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई महापालिकेने हाय अलर्ट दिला आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFच्या तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

6 अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत. NDRF च्या 3 तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.मिठी नदीची पातळी वाढली तर स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

24 वॉर्डमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून गरज पडल्यास शाळा उघडून ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.पाण्याचा निचरा करण्यासाठी 6 पंपिंग स्टेशन्स आणि 299 पंप कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिकेने दिले असून सर्व प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगण्यात आलं आहे.