चिंताजनक! कोरोनाच्या 6 महिन्यांच्या अभ्यासानंतर ‘WHO’ खुलासा
3 Aug :- जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.देशात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे.कोरोना विषाणूचं संक्रमण पसरत असून याला 7 महिन्यांचा अवधी उलटला आहे. कोरोनाचा गुणाकार प्रशासनाला आणि नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.4 वेळा जागतिक आरोग्य संघटनेच्या कमिटीमार्फत मूल्यांकन करण्यात आले आहे. मात्र कोरोना विषाणूचा सतत अभ्यास सुरु आहे.यावर औषध निघालेलं नाही मात्र कोरोनाविषयी महत्त्वाचं संशोधन होत असून कोरोनाच्या 6 महिन्यांच्या अभ्यासानंतर WHO धक्कादायक खुलासा केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगातील तब्बल 680000 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या व्हायरसने जगातील 80 लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे.कोरोनाचा धोका फार काळ लांबू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.”कोरोनाच्या 6 महिन्यांच्या अभ्यासानंतर आरोग्य संघटनेने असा इशारा दिला आहे.”अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला.
मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.कमिटीची इच्छा आहे की व्हायरसच्या अन्य घटकांवरही लक्ष केंद्रीत केलं जावं. उदा. संक्रमणाचं माध्यम, व्हायरसचे राहते ती जागा, म्युटेशन, संक्रमणापासून बचावासाठी रोगप्रतिकारशक्ती. ही बैठक जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जेवेव्हात झाली. व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून लोक यात सहभागी झाले.