बीड- राखी पोर्णिमे दिवशीच कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
3 Aug :- बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर आहे.कोरोना विषाणूने बीड जिल्ह्यात साम्राज्य निर्माण केले असून बीड जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढू लागले आहे.बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी केंटमेन्ट झोन आहेत पण प्रशासनाने जाहीर केलेले कंटेंमेंट झोन फक्त नावापुरतेच आहेत.आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राखी पोर्णिमे दिवशीच बीड जिल्ह्याकरिता दुःखद बातमी समोर आली आहे.
गेवराई तालुक्यातील रहिवाशी आणि काही दिवसापासून बीड शहरात राहत असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेचा जिलह रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे,अंबाजोगाई आणि बीडच्या जिल्हा रुग्णालयात तब्बल 33 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत .
सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला,या महिलेला चार दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला