बीड

भाजप नेत्याला पोलिसांकडून अत्यंत घृणास्पद वागणूक; धक्क्याने झाला मृत्यू

मिर्जापूर, 3 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यात भाजप नेत्याला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. यातून धक्का सहन न झाल्याने नेत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यातील भाजप बूथ प्रभारीकडून पोलीस ठाण्यातील शौचालय साफ करण्याचं प्रकरणातील राजकारण समोर येत आहे. बूथ अध्यक्ष कन्हैया लाल बिंद यांना जिगना ठाण्यातील शौचालय पोलिसांनी साफ करायला सांगितलं. यातून नेत्याला धक्का बसला. हे सहन न झाल्याने नेत्याचा मृत्यू झाला आहे.

आता भाजप नेता आपले सरकार असताना पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि अपना दलचे स्थानिक आमदार अनुप्रिया पटेल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या प्रकरणात तपास करण्याची मागणी केली आहे.

सांगितले जात आहे की जमिनीच्या विवादावरुन जिगना ठाण्याचे प्रमुख शिवानंद राय यांनी भाजप बूथ प्रभारी यांना पकडून ठाण्यात आणले आणि त्यांच्यासोबत वाईट वर्तणूक केली. इतकचं नाही तर त्यांनी भाजप नेत्याकडून ठाण्यातील शौचालय साफ करवून घेतले. ज्यामुळे कन्हैया लाल यांना मोठा धक्का बसला होता. अशातच त्यांचा 29 जुलै 2020 रोजी मृत्यू झाला.  पोलिसांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार भाजप नेत्याला अनेक आजार होते. यातून त्यांचा मृत्यू झाला आहे.