Popular News

सुखद! कोरोना लशीची ठरली तारीख

2 Aug :- जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.देशात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक होत चाललं आहे.कोरोनाचा गुणाकार प्रशासनाला आणि नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.मात्र कोरोना विषाणूचा सतत अभ्यास सुरु आहे.यावर औषध निघालेलं नाही मात्र कोरोनाविषयी महत्त्वाचं संशोधन होत असून जगामध्ये सर्वत्रच कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लस बनवण्याचे काम युद्धपातळी वर सुरु आहे.गभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 1, कोटी 77 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 6 लाख 82 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

असे असले तरी कोरोनावर लस अद्याप मिळालेली नाही.एकीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. तर, रशियाने आता थेट सार्वजनिक लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. कारण ऑगस्ट अखेरीस कोरोनाची लस देण्याचा विचार रशिया करत आहे.रशिया देशातील आपल्या प्रायोगिक कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची तयारी करत आहे. एवढेच नव्हे तर या लसीचे 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा मॉस्कोचा मानस आहे.

रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी म्हटले आहे की एका महिन्यासाठी 38 लोकांची पहिली चाचणीही या आठवड्यात पूर्ण झाली. ही लस वापरण्यास सुरक्षित आहे आणि रोग प्रतिकारशक्ती देखील विकसित करीत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. ऑग्सटमध्ये रशियाला व सप्टेंबरमध्ये इतर देशांमध्ये या लसीच्या उत्पादनाचे काम सुरू होईल.