क्रीडा

IPL रोमांच लांबणीवर; तारीख बदलली!

2 Aug:- भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय क्रिकेट खेळ आणि क्रिकेटमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असणारा IPL रोमांच एकंदरीत IPL चा रोमांचक सिझन भारतामध्ये एका सन-उत्सवासारखा साजरा करण्यात येतो.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे IPL रोमांच पासून दूर राहावे लागते कि काय असा प्रश्न तमाम भारतातील क्रिकेट प्रेमींमध्ये घर करत होता.काही दिवसापूर्वी IPL २०२० चे सिझन सुरु असल्याचे जाहीर करण्यात आले होते.काही दिवसांमध्येच IPL चे सर्व सामन्यांचे वेळापत्रक देखील येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान आयपीएलच्या तारखांची अधिकृत माहिती देण्यात आली असून आयपीएलचा यंदाचा सीझन 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

काही दिवसांपूर्वी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनीही याबाबतची माहिती दिली होती.’19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याबाबत आमची चर्चा झाली. या स्पर्धेत सामील होणाऱ्या संघांनाही आम्ही याची माहिती दिली आहे,’ असं ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र ताज्या माहितीनुसार आयपीएलचा अंतिम सामना 8 नव्हे तर 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.