बीड

कोरोनाग्रस्त मोटा भाईंकरिता गांधींचे विशेष ट्विट!

2 Aug :- देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.सर्व सामान्य माणसांसह मोठी मोठी सेलिब्रेटी,अभिनेते,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी सुद्धा कोरोनाच्या चपेटीत अडकले आहेत. काही वेळेपूर्वी समजलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे.देशातील जनतेसह अनेक दिग्ग्ज मंडळींनी अमित शहांची प्रकृती बारी होण्याकरिता प्रार्थना सदिच्छा दिल्या आहेत.

दरम्यान राहुल गांधी यांनीही ट्वीट अमित शाह यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. “राजकीय स्तरावर जरी मतभेद असली तरी व्यक्तिशः कुठलाच विरोध नसतो असे राहुल गांधीने केलेल्या ट्विट मधून स्पष्ट होते.